Vasant More Latest News
Vasant More Latest News

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ? वसंत मोरेंना भाजपकडून मोठी ऑफर, बड्या नेत्यानं केला फोनवरुन संपर्क

शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी वसंत मोरे यांचं स्वागतही केलं होतं. परंतु, आता राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे.
Published by :

Vasant More Latest News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम केलेले वसंत मोरे महाविकास आघाडीत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोरे यांनी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात नुकतीच हजेरी लावली होती. शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं. परंतु, आता राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाकडून वसंत मोरे यांना मोठी ऑफर दिल्याचं समजते आहे. भाजपच्या बड्या नेत्यानं त्यांना राज्यस्तरावरील पद आणि विधानसभेची ऑफर दिली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

वसंत मोरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ऑफर देण्यात आली होती. आता भारतीय जनता पक्षाकडूनही मोरे यांना मोठी ऑफर देण्यात येत असल्याचं समजते आहे. भाजप पक्षप्रवेश करण्याबाबत मोरेंना भाजपच्या बड्या नेत्यानं फोनवरून संपर्क साधल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यस्तरावरील पद आणि विधानसभेची ऑफर मोरे यांना देण्यात आली आहे. परंतु, वसंत मोरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

त्यांना कोणत्याही पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आलेलं नाही. सर्वच पक्षांच्या ऑफर वसंत मोरे यांना येत असल्याचंही कळते आहे. पण मोरे महाविकास आघाडीत प्रवेश करण्याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. तसंच राजकीय परिस्थिती अनुकूल नसेल, तर ते अपक्षही निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com