नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर; भाजपाला मोठा धक्का!

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर; भाजपाला मोठा धक्का!

नंदुरबार जिल्ह्यात नवापूर आणि शहादा बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.
Published by :
shweta walge

नंदुरबार जिल्ह्यात नवापूर आणि शहादा बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. राज्याच्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला नाकारल्याचे चित्र आहे.

नंदुरबार बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये मंत्री गावित गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदारांनी प्रस्थापित राजकारण्यांना दूर सारख्या अनेक शेतकरी विकास आघाडीच्या अभिजीत पाटलांकडे सत्तेची किल्ली दिली आहे. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला बालेकिल्ला शाबित राखला आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर; भाजपाला मोठा धक्का!
भाऊ जिंकला, बहीण हरली! पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का

काँग्रेस नेते आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 11 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला आहे. तर भाजपाला सहा जागा मिळाल्या आहेत. एकूणच नंदुरबार जिल्हा बाजार समितीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सहापैकी दोन बाजार समिती बिनविरोध झाल्या होत्या तर अक्कलकुवा बाजार समितीच्या निवडणुकीत 15 जागा बिनविरोध झाल्या असून अवघ्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुकीच्या नांदी या बाजार समितीच्या निवडणुकीच्या चित्रावरून स्पष्ट झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com