२७ जानेवारीला भाजपा नेते अद्वय हिरे यांचा होणार शिवसेना प्रवेश

२७ जानेवारीला भाजपा नेते अद्वय हिरे यांचा होणार शिवसेना प्रवेश

भाजप नेते अद्वय हिरे यांचा होणार शिवसेना प्रवेश

संदीप जेजुरकर, नाशिक

शिवसेना ठाकरे गटाने मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पूढे आव्हान उभे करण्यासाठी भाजप नेते डॉ.अद्वय हिरे यांना गळाला लावले असून, डॉ.हिरे यांचा २७ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मुंबईच्या शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित झाल्याने मालेगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार आहे.

डॉ.अद्वय हिरे यांना मोठा राजकिय वारसा असून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर चांगले वर्चस्व आहे. पक्ष प्रवेशाला मालेगावातून हजारो कार्यकर्ते जाणार असून त्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाबरोबर युती झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान मिळत आहे.त्यामुळे घुसमट होती.जनतेचे कामे होत नसल्याने आता शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणूक लढविण्याचा मनोदय डॉ.हिरे यांनी बोलून दाखविल्यान मालेगाव बाह्य मतदार संघात पालकमंत्री दादा भुसे विरुद्ध डॉ.अद्वय हिरे असा सामना रंगणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com