बावनकुळेंच्या भाषणात कार्यकर्त्यांच्या डुलक्या; कुणाला येतोय आळस, तर कुणी घेतयं डुलक्या
Admin

बावनकुळेंच्या भाषणात कार्यकर्त्यांच्या डुलक्या; कुणाला येतोय आळस, तर कुणी घेतयं डुलक्या

सध्या राज्यात पाच शिक्षक मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात पाच शिक्षक मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. याच दरम्यान भाजपा उमेदवार किरण पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बावनकुळेंनी प्रचार सभा देखील घेतली. मात्र याच सभेत बावनकुळेंचं भाषण सुरू होताच भाजप नेत्यांनी डुलक्या मारल्या. कुणाला आळस येत होता.

या प्रचारसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे आणि भाजपचे मंत्रीही उपस्थित होते. दरम्यान यावेळी रॅली काढत आणि प्रचारसभा घेऊन भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना आळस येत होता, सहकारमंत्री अतुल सावे चक्क डोळे लावून डुलक्या घेत होते. तर भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे देखिल डुलक्या घेत होते. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com