Rupali Chakankar, Chitra  Wagh
Rupali Chakankar, Chitra WaghTeam Lokshahi

'अशा ५६ नोटिसा आल्या...' चाकणकरांवर चित्रा वाघांचा पलटवार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी सकाळी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्या नोटीसाला प्रतिउत्तर देत म्हणाल्या आहेत.
Published by :
shweta walge

मला अशा ५६ नोटिसा आल्या आहेत. त्याला मी घाबरत नाही. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी वादळ उठवलं आहे. महाराष्ट्र राज्यात हे चालणार नाही, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी सकाळी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्या नोटीसाला प्रतिउत्तर देत म्हणाल्या आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नोटीस पाठविली आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे, मला अशा ५६ नोटिसा आल्या आहेत. त्यात काही विशेष नाही. त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. महिला अयोगात या एकट्या नाहीत, असं म्हणत चित्रा वाघ बरसल्या. त्यांना दिलेलं उत्तर महिला आयोगाने प्रसिद्ध करावं, असं आव्हान चित्रा वाघ यांनी दिलं आहे.

सुप्रिया सुळेंनी देखील या वादात उडी घेत चित्रा वाघ यांच्यावर बोलल्या होत्या. त्याबाबत चित्रा वाघ यांनी आपले मत मांडलं. त्या म्हणाल्या की, रुपाली चकणकर या बाष्कळ विधान करतात, त्यांना सांगा. सुप्रिया सुळेंना मान्य आहे का? रस्त्यावर नंगा नाच सुरू असलेलं. आमची भूमिका हे आहे की, उर्फी जावेदच हे नंगा नाच आम्ही मान्य करणार नाही. राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणावर त्यांनी संधान साधत अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली राज्यामध्ये स्वैराचार नंगानाच सुरू आहे. या विरोधात बोलले तर नोटीस पाठवता ही कसली पद्धत? पहिल्यांदा आपल्या बाईचे कान टोचा. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं सांगताना विरोधकांसह महिला आयोगावरही टिका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com