Urfi Javed, Chitra Wagh
Urfi Javed, Chitra WaghTeam Lokshahi

ऐकलं तर ठीक. नाहीतर आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू; चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाडच रंगवेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला होता. यावर उर्फीने आता प्रत्युत्तर दिले असून चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले आहे. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले आहे.

उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे. सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. ट्विट करत त्यांनी उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. याच मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर देखील टीका केली होती. उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याल ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. मात्र याच पार्श्वभूमीवर आता चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिला आहे. चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि उर्फीसह, रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा देतानाच नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही. मात्र मला नोटीस पाठवली गेली. असे चित्रा वाघ म्हणाल्या. यासोबतच चाकणकर तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारात सोडवा. अभ्यास… अभ्यास करू नका. मीही यापूर्वी आयोगावर होते. आपण आता आलात. तुम्ही नोटीस दिली त्याला उत्तर दिले आहे. ते उत्तर पण प्रसिद्ध करा. आयोगाला उत्तर दिले रुपाली चाकणकर या व्यक्तीला नाही. आयोग उत्तम काम करीत आहे व्यक्तीवर आक्षेप आहे,. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्याविरोधातील षडयंत्रावर भाष्य केलं आहे. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी आत्मचिंतन करावे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com