उलटी गंगा… शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर आता भाजपतही फूट

उलटी गंगा… शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर आता भाजपतही फूट

अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील
Published by :
shweta walge

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर आता भाजपातही पक्षफुटीला सुरुवात झाली आहे. कारण कोल्हापुरातील भाजपच्या एका बड्या नेत्याने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील असा सर्वच राजकीय पक्षांनी अंदाज लावला होता, आणि हा अंदाज काही प्रमाणात बरोबरही ठरला. पण अजितदादांकडे येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. याउलट भाजपचे नेते शरद पवार गटात प्रवेश केल्याचं समोर येत आहे.

येत्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून पर्यायी नेते शोधण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील चंदगड येथील भाजपचे नेते सुरेश घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com