Maharashtra Politics : अजितदादांचा भाजपला झटका
Maharashtra Politics : अजितदादांचा भाजपला झटका; माजी उपाध्यक्ष अजितदादांच्या गटात Maharashtra Politics : अजितदादांचा भाजपला झटका; माजी उपाध्यक्ष अजितदादांच्या गटात

Maharashtra Politics : अजितदादांचा भाजपला झटका; माजी उपाध्यक्ष अजितदादांच्या गटात

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठी राजकीय हालचाल झाली आहे. पाटण तालुक्यातील भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठी राजकीय हालचाल झाली आहे. पाटण तालुक्यातील भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विक्रमबाबा पाटणकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटण तालुक्यात त्यांचा मजबूत प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. या पक्षांतरामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांवर परिणाम होणार असून, पाटणमध्ये राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विक्रमबाबा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पाटणकर कुटुंबातील राजकीय भूमिका वेगवेगळी झाली आहे. महायुतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच विक्रमबाबा पाटणकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com