'शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ED येईल' भाजपच्या मंत्र्याची लोकसभेतच विरोधकांना धमकी
bjp

'शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ED येईल' भाजपच्या मंत्र्याची लोकसभेतच विरोधकांना धमकी

बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू असून त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आले आहेत.
Published by  :
shweta walge

दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना भाजपच्या दिल्लीतील खासदार आणि केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी विरोधकांना शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ईडी येईल अशी जाहीर धमकी दिली आहे. मिनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू असून त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आले आहेत. या विधेयकावर विरोधक गदारोळ करत असताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, ईडी तुमच्या घरी येऊ नये म्हणून शांत राहा. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.

'शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ED येईल' भाजपच्या मंत्र्याची लोकसभेतच विरोधकांना धमकी
Ashish Shelar : रशेष शाह यांचा बोलविता "धनी" कोण?

दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयका 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com