शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरांच्याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचे गौप्यस्फोट...

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरांच्याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचे गौप्यस्फोट...

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरांच्याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचे गौप्यस्फोट...

संजय देसाई, सांगली

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत,असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत खानापूर आटपाडी मतदार संघात 2024 मध्ये भाजपाचा उमेदवार असेल आणि तो उमेदवार आपण असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केलं आहे,ते सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मोही याठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते पार पडला आहे.

बाबर यांच्या बाबतीत गौप्यस्फोट करताना पडळकर म्हणाले ,केवळ 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे अनिल बाबर आमदार झाले.तसेच आपण त्यावेळी बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना बारामती मध्ये भल्या पहाटे भेट अनिल बाबर व त्यांचे जेष्ठ सुपुत्र अमोल बाबर हे भेटायला आले होते,त्यांनी पाठिंबा घेत 2024 ची विधानसभा निवडणुक अनिल बाबर लढवणार नसल्याचा शब्द देत 2024 च्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात तुम्हाला पाठिंबा देण्याचा शब्द दिला आहे,तो ते पाळतील,त्यामुळे 2024 ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत,असा गौप्यस्फोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे,तसेच 2024 च्या विधानसभा निवडणूकीत खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार आणि ते आपण असणाऱ असल्याचे असल्याचे जाहीर केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com