आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा
सातारा - प्रशांत जगताप : मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आणि त्यातील सदस्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे ( BJP ) आमदार जयकुमार गोरे ( Jaikumar Gore ) यांच्यासह सहा जणांवर विविध काल माणसं वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. आमदार गोरेंवर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला नाही तर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका स्मिता कदम या महिलेला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.याबाबत आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान पहिल्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनिल मेनन आणि एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार देत पुढील सुनावणी 17 मे रोजी निश्चित केली आहे.. त्यामुळे आमदार गोरेवर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.