2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू - नितेश राणे

2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू - नितेश राणे

भाजपा आमदार नितेश राणे हे वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे हे वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

नितेश राणे म्हणाले की, कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झालाय. २०२४ मध्य आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, असा जोरदार हल्लाबोल नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केला आहे.

यासोबतच त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरसुद्धा टीका केली आहे. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची. हिंदू धर्मावर टीका करायची. फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची. वीर सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com