Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray

देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंना फोन करून भेटण्याची वेळ मागितली; प्रसाद लाड यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना फोन करून भेट घेण्याची वेळ मागितली, अशी माहिती समोर आलीय. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

Prasad Lad On Uddhav Thackeray Call Issue : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जूनला जाहीर केला जाणार आहे. या निकालाबाबत अनेक राजकीय तज्ज्ञ मंडळींकडून एक्झिट पोल सांगण्यात आले आहेत. या निकालाबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागली असताना एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना फोन करून भेट घेण्याची वेळ मागितली, अशी माहिती समोर आलीय. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?

"हा कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे. उद्धव ठाकरेंची वेळ मागायचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरेंशी बोलायचा काय, त्यांच्याशी संबंध ठेवायचा विषय येत नाही. ही कुणीतरी खोटी माहिती प्रसारित केली आहे. याचं मी खंडन करतो. अशी प्रकारची माहिती देणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. त्यांना नोटिस पाठवली जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा काय, त्यांच्याशी बोलण्याचाही विषय येत नाही. हे आमचं स्पष्ट मत आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com