Anil Parab vs Pravin Darekar : अनिल परब माफी मगा, सभागृहात सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी

Anil Parab vs Pravin Darekar : अनिल परब माफी मगा, सभागृहात सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी

अनिल परब यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत वाद, सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी, प्रविण दरेकरांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल
Published by :
Prachi Nate
Published on

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी अधिवेशनात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'छत्रपती संभाजी महाराज यांना धर्म बदलण्यासाठी औरंगजेबाने जसा छळ केला, तसाच पार्टी बदलण्यासाठी माझा छळ करण्यात आला',असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं.अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

अनिल परब यांच्याकडून भाजपच्या आमदारांवर थेट आरोप

यादरम्यान अनिल परब यांनी भाजपच्या आमदारांवर मोठे आरोप केले आहेत. "सभागृहातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलं आहे, त्या आमदाराचे नाव श्रीकांत भारतीय आहे. पहिली त्याची माफी घ्या. कोरटकर आणि सोलापूरकरांचा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आला आहे", असे आरोप त्यांनी भाजप आमदरांवर केलेल आहेत. यामुळे सभागृहात सत्ताधाऱ्यांनी अनिल परब माफी मगा अशी घोषणाबाजी केली.

मी अनिल परब यांचा धिक्कार करतो- प्रविण दरेकर

याचपार्श्वभूमिवर प्रविण दरेकर अधिवेशनात म्हणाले की, "मी अनिल परब यांचा धिक्कार करतो. याच कारण असं की, जे झालय त्यात आपण कस योग्य आहे, हे मगलूरीच आहे की शंभूराजे कुत्र्याचं नाव पुन्हा त्याठिकाणी पिजन बॉक्सला कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. सभापती महोदय हे कुठल सभागृह आहे? असा प्रश्न प्रविण दरेकरांनी केलेला आहे. तसेच पुढे दरेकर म्हणाले की, त्यांनी जे केल आहे त्यांना ते कोणत्याही ठिकाणी चुकीच केलं आहे अस वाटत नाही आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. छत्रपती शंभूराजे यांच्या विषयी बोलल्यानंतर आता ते प्रकरण तुमच्यावर ढकलत आहेत. तुम्ही जी तुलना केली आहे त्यात तुमची काय लेव्हल आहे का?", अस म्हणत प्रविण दरेकरांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com