Admin
बातम्या
‘आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो; भाजपा आमदाराचं विधान
भाजपा आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत एक वक्तव्य केलं.
भाजपा आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत एक वक्तव्य केलं. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यावर भाष्य करताना भाजपा आमदार रमेश पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, हे सरकार चांगलं काम करतंय आणि चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत.
खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ते गुजरातहून येतं. त्यामुळे आम्ही साफसफाई करुन जो माणूस आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. असे रमेश पाटील म्हणाले. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांनी पक्षप्रवेश केला. असे ते म्हणाले. त्यांनी केलेले हे विधान आता चांगलेच व्हायरल होत आहे.