भाजपा आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ; देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ; देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झालीय.

विकास माने, बीड

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झालीय. देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय. धस यांच्यासह पाच जणांवर अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलीय. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 2019 मध्ये देवस्थानची जमीन बळकाविण्याचा धस यांच्यावर ठपका ठेवत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com