भाजप आमदाराच्या मुलाच्या 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

भाजप आमदाराच्या मुलाच्या 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

भाजप आमदाराच्या मुलाच्या घरातून ६ कोटी रुपयांचे घबाड जप्त

बंगळूरु : कर्नाटकात भाजप आमदाराच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ही कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर त्यांच्या घरावर छापा टाकला असता सहा कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे. भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल असे त्यांचे नाव आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाजप आमदाराच्या मुलाच्या 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
परिक्षेच्या आधीच फुटला बारावीचा गणिताचा पेपर फुटला

कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे आमदार मदल विरुपक्षप्पा हे सरकारी मालकीच्या कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. हे प्रसिद्ध म्हैसूर सँडल साबण तयार करते. त्यांचा मुलगा बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळात लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.

माहितीनुसार, प्रशांत यांनी साबण आणि इतर डिटर्जंट्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच घेताना पकडला गेला. त्यांनी 80 लाख रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार ठेकेदाराने आठवड्यापूर्वी लोकायुक्तांकडे केली होती. त्यानंतर प्रशांतला रंगेहाथ पकडण्याची योजना आखण्यात आली होती.

यानुसार बेंगळुरूतील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड येथील कार्यालयात प्रशांत कुमार लाच घेण्याकरीता आले असता त्यांना अटक करण्यात आली. यानंतर प्रशांत यांच्या घराची झडती घेतली. यात सुमारे 6 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com