मूर्ख आहेस का? खासदार अनिल बोंडे व शिवव्याख्याते यांच्यात एकाच मंचावर जुंपली

मूर्ख आहेस का? खासदार अनिल बोंडे व शिवव्याख्याते यांच्यात एकाच मंचावर जुंपली

अमरावतीमधील शिवजयंतीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अमरावतीमधील शिवजयंतीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून तुषार उमाळे हे देखिल उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम दरम्यान खासदार अनिल बोंडे व शिवव्याख्याते यांच्यात एकाच मंचावर जुंपली. यावेळेचा भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी तुषार उमाळे यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, महाराजांविषयी कोणत्या पद्धतीने बोलायचे, हेच आपल्या लोकांना कळत नाही. शिवाजी महाराज म्हणजे, माँसाहेब सांगायच्या, महाराज नाश्ता करायचाय, दोन मुसलमान कापून या. गेले खपाखप दोन मुसलमान मारले, नाश्ता केला. आता जेवायची वेळ झाली, १२ वाजले, महाराजा चार मुसलमान कापून या, मग महाराज गेले चार मुसलमान कापून जेवायला आहे. आता संध्याकाळची वेळ झाली, आता सहा तरी होऊन जाऊ द्या. संध्याकाळी महाराजांनी पुन्हा सहा मुसलमान कापले. उठलं की फक्त मुसलमानच मारायचे, महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता. असे त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.

यावर अनिल बोंडे संतापले आणि त्यांना थांबवत म्हणाले की, ' ए शहाण्या मुर्ख आहे का? असे म्हणाले. यावर प्रतिउत्तर देत लगेच तुषार उमाळे यांनीसुद्धा 'तुम्ही मुर्ख असाल' असे म्हणाले. त्यानंतर दोघांमध्ये कार्यक्रमस्थळी गोंधळ आणि काहीसा तणाव पाहायला मिळाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com