“स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे - भाजपा खासदार सौमित्र खान

“स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे - भाजपा खासदार सौमित्र खान

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. सौमित्र खान म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. “स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत. मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटते,” असे ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याती शक्यता आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर खान यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com