'INDIA म्हणजे इंग्रजांनी दिलेली शिवी'; 'या' भाजप खासदाराचे विधान

'INDIA म्हणजे इंग्रजांनी दिलेली शिवी'; 'या' भाजप खासदाराचे विधान

विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या आघाडीचे 'इंडिया' ('I.N.D.I.A') असे नामकरण केलं आहे.
Published by  :
shweta walge

विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या आघाडीचे 'इंडिया' ('I.N.D.I.A') असे नामकरण केलं आहे. तेव्हापासून 'इंडिया' हा शब्द चर्चेत आहे. या आघाडीच्या नावावरून भाजप नेते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यावरच राज्यघटनेत उल्लेख केलेला 'इंडिया' हा शब्द इंग्रजांनी दिलेली शिवी असल्याच भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भाजप विरोधी इंडिया आघाडीच्या नावावर प्रश्न उपस्थित केला आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात हरनाथ सिंह यादव बोतल होते.

ते म्हणाले की, "संपूर्ण देशाची मागणी आहे की आपण 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरावा. 'इंडिया' हा शब्द ब्रिटिशांनी दिलेला शब्द आहे. 'इंडिया' हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे तर 'इंडिया' ही एक शिवी आहे. मला असं वाटतं की, आपल्या राज्यघटनेत बदल व्हावा आणि त्यात 'भारत' हा शब्द जोडला जावा.'' अशी मागणी त्यांनी केली आहे.

'INDIA म्हणजे इंग्रजांनी दिलेली शिवी'; 'या' भाजप खासदाराचे विधान
'भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर भारत नाव लिहा' माझी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची मागणी

दरम्यान, 'इंडिया' या विरोधी गटाच्या नावाला अनेक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. मात्र, या नावाला कोणाचा आक्षेप नसावा, असे 'इंडिया'चे नेते सांगतात. आघाडीने 'इंडिया' नावाची घोषणा केल्यापासून भाजपने त्यावर सातत्याने हल्लाबोल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com