भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार; संजय राऊत म्हणाले...

भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार; संजय राऊत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. उन्मेष पाटील दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटीलजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी हे मोठ्या संख्येने आज मातोश्रीवर 12 वाजता शिवसेना परिवारात प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव लोकसभा निवडणूक ही अधिक रंगतदार आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेने हमखास घेऊन जाणारा हा प्रवेश आहे.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आज उद्या उमेदवार नक्की जाहीर करतील. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशानं जळगावची शिवसेना ही मजबूतीने पुढे जाईल. शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावमध्ये शिवसेनेचा खासदार यावेळेला प्रथमच जळगावमधून लोकसभेवर निवडून जाईल. याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com