जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का; भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार

जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का; भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. उन्मेष पाटील दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काल उन्मेश पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती त्यानंतर आज ते पक्ष प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com