राणा दाम्पत्याला अमरावतीत भाजप कडून विरोध

राणा दाम्पत्याला अमरावतीत भाजप कडून विरोध

रवी राणा यांच्या दहीहंडीच्या दिवशी रोजगार बुडालेल्या 100 हॉकर्सला भाजपाने केली मदत
Published by  :
shweta walge

अमरावती/सूरज दाहाट; 10 तारखेला अमरावतीच्या नवहाथे चौकात आमदार रवी राणा व नवनीत नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्ष्याच्या वतीने दहीहंडीचे आयोजित करण्यात आली होती. तेथील हॉकर्सच्या हातगाड्या हटवून त्याचा रोजगार बुडवल्याच्या आरोप भाजप नेते व माजी गट नेते तुषार भारतीय यांनी केला व नुकसान झालेल्या 100 हॉकर्सला यावेळी प्रत्येकी 2100 रुपयाच्या चेकचे वाटप केले.

यामुळे राणा दाम्पत्याला भाजपा कडून अमरावतीमध्ये उघड विरोध होताना दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून नट्या आणतात आणि हॉकर्स चा विचार तुम्ही करत नाही. कामाच्या भरोशावर मत मिळत नाही म्हणून नट, सेलिब्रिटी आणायच्या व नेत्यांना गर्दी दाखवायची, पण नेताना समझते गर्दी कोणाच्या मागे आहे, असा टोला भाजपाचे माजी गटनेते व आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय यांनी लावला आहे.

या ठिकाणी दहीहंडी चा राजकीय वापर होत असेल तर हिंदू कसा सहन करेल? देवेंद्र फडणवीस त्या दहीहंडीला अतिथी म्हणून आले होते ते आयोजक नव्हते मात्र आम्ही त्यांना हे सगळं सांगणार आहे असंही ठिकाण भारती यांनी सांगितलं. आमचे विचार सत्तेच्या सोयीनुसार बदलवले नाही.काल तुमचे विचार वेगळे होते आता तुमचे विचार बदलले,असा टोला देखील भारतीय यांनी लावला. यावेळी आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते हॉकर्स ला चेक चे वाटप करण्यात आले..

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com