Ashish ShelarTeam Lokshahi
बातम्या
भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे.
आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात हे पत्र आलं आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले. याबाबत आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली.