Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचा एल्गार! उद्या राज्यभर उपसणार आंदोलनाचं हत्यार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

महाड येथे मनुस्मृतीचं दहन करून जितेंद्र आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला.
Published by :

Chandrashekhar Bawankule On Jitendra Awhad : मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश न करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाड येथे मनुस्मृतीचं दहन करून आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून भारतीय जनता पक्षाने आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. आव्हांडांविरोधात भाजपने एल्गार केला असून राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पक्ष आव्हाडांना धडा शिकवणार आहे. आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. महाड येथील चवदार तळ्याजवळ आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, डॉ. जितेंद्र आव्हाडांनी याबाबत माफी मागितली पाहिजे. एकप्रकारे हा देशद्रोह झाला आहे. मनुस्मृती आणि मनाचे श्लोक पाठ्यपुस्तकात टाकण्यात येणार नाहीत, हे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं. अजितदादांनी सांगितल्यावरही आव्हाडांनी स्टंटबाजी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडल्या आहेत. असं फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा हा अवमान आहे. हा देशाचाही अवमान आहे. जितेंद्र आव्हाडांनी या देशाची माफी मागावी. अन्यथा आव्हाडांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com