Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर निवडणुकीत भाजप-शिंदेसेना आमनेसामने, राजकीय वातावरण तापले
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर 29 प्रभागांतील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत. भाजपने 92 तर शिंदेसेनेने 25 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची धार वाढण्याची शक्यता आहे. ५८चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपची खरी कसोटी आता शिंदेसेनेविरोधात लागणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत फूट
भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात
जागावाटपावरून मतभेद झाल्याने थेट लढत
29 प्रभागांतील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने
भाजपकडून 92 उमेदवार, शिंदेसेनेकडून 25 उमेदवार मैदानात
विकासकामांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांची राजकीय लढाई तीव्र होण्याची शक्यता
