किंचित सेनेचा वंचित सेने सोबत घरोबा; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरे सेनेवर सडकून टिका

किंचित सेनेचा वंचित सेने सोबत घरोबा; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरे सेनेवर सडकून टिका

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गडचिरोलीत मतदार मेळाव्याला मार्गदर्शन केले. रा

व्यंकटेश दुडमवार, गडचिरोली

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गडचिरोलीत मतदार मेळाव्याला मार्गदर्शन केले. राज्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना संपूर्ण राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगत त्यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने उमेदवाराबाबत केलेल्या घोळामुळे त्यांचा उमेदवार कोण हेच समजत नसल्याचे म्हटले.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची ठाकरेसेने सोबत झालेली आघाडी म्हणजे किंचित सेनेने वंचित सेने सोबत घरोबा केल्याचा टोला त्यांनी लगावला. शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत शिंदे- फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतले असून शिक्षकांनी २००५ मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करणाऱ्या काँग्रेसवर बहिष्कार घालावा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com