ताज्या बातम्या
पाच वर्षांमध्ये भाजप मुख्यमंत्री बदलणार; तृप्ती देसाई यांचा मोठा दावा
भाजपने पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री बदलून यावेळी महिलेला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य गुन्हेगारीमुक्त करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला मिळो, असं साकडं विठ्ठलाला घातलं. तसेच या पाच वर्षात भाजप मुख्यमंत्री बदलणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. या निमित्ताने राज्याला महिला मुख्यमंत्री मिळू दे, असे त्यांनी सरकारला सुचवले आहे. मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा असू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
"सध्या महिलांची गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांकडून पुरुषांवर होणारे अन्याय, अत्याचार, खून पाहता महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोग स्थापन करणे गरजेचे आहे. आपण काय करतोय याचे महिलांनी भान ठेवावे," असे आवाहन तृप्ती देसाई यांनी महिलांना केले आहे.