Jat Election : जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार..गोपीचंद पडळकरांनी केले भाजप उमेदवार निश्चित

निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे.
Published by :
Varsha Bhasmare

निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्साहामध्ये पक्षाची उमेदवारी मिळणार का नाही? याची धाकधूक देखील लागलेली आहे. त्यात आता जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे, गोपीचंद पडळकरांनी भाजप उमेदवार निश्चित केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com