'आम्हाला मणिपूरवर बोलण्यापासून रोखण्यात आले, आमचे हात बांधले गेले' भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

'आम्हाला मणिपूरवर बोलण्यापासून रोखण्यात आले, आमचे हात बांधले गेले' भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

देशभरात मणिपूर प्रकरणावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या नागा पीपल्स फ्रंट (NPF) च्या एका खासदाराने मोठे विधान केले
Published by  :
shweta walge

देशभरात मणिपूर प्रकरणावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या नागा पीपल्स फ्रंट (NPF) च्या एका खासदाराने मोठे विधान केले आहे. आम्हाला मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत बोलण्यापासून रोखण्यात आलं असल्याचं NPF खासदार लोर्हो फोज म्हणाले आहेत.

फोज म्हणाले की, आम्हाला मणिपूरवर संसदेत बोलायचे होते, परंतु उच्च अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. आम्ही भाजपचे मित्र आहोत, पण आम्हाला आमच्या लोकांसाठीही बोलावे लागेल.

त्यांना कशामुळे थांबवले असे विचारले असता, फोज म्हणाले, "आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही भाजपचे मित्र आहोत, त्यामुळे आम्हाला काही आदेशांचे पालन करावे लागेल." भाजपने मणिपूरमध्ये खूप काम केले आहे, अगदी डोंगराळ भागातही, पण अलीकडे ज्या पद्धतीने हा मुद्दा हाताळला गेला तो चुकीचा आहे.

'आम्हाला मणिपूरवर बोलण्यापासून रोखण्यात आले, आमचे हात बांधले गेले' भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप
मोठी बातमी! दिल्ली सेवा विधेयकाचं अखेर कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींकडून मिळाली मंजुरी

दरम्यान राहुल गांधींचे कौतुक करताना फोज म्हणाले, 'राहुल गांधी हे आमच्या विरुद्धच्या शिबिरातील आहेत, त्यांनी मणिपूरला ज्या प्रकारे भेट दिली आणि लोकांना भेटले ते पाहून मी प्रभावित झालो. यावेळी त्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com