भाजपच्या विजयानंतर कुरघोडीचं राजकारण?श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

भाजपच्या विजयानंतर कुरघोडीचं राजकारण?श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

नुकतंच देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा विजय झाला.
Published by :
shweta walge

नुकतंच देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. यानंतर देशभर जल्लोष केला जात आहे. देशभरातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं दिसत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघावर भाजप आमदाराने दावा केला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपने कुरघोडीचं राजकारण सुरु केलं आहे का? अशी राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यामुळे कल्याणमध्ये जल्लोष करण्यात आला. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष केला. हा विजय उत्सव साजरा करत असताना गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे.

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष आघाडीवर असेल. तसंच 100 % कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील निवडून येतील, असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप कल्याण लोकसभेला आपला उमेदवार देणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील आणि 100% निवडून येतील, असा दावा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com