Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. याच्याआधी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, अरुण सिंह, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, बीएल संतोष उपस्थित होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव येथून लढणार आहे. सीटि रवि यांन चिकमंगलुरू येथून तिकिट देण्यात आले आहे. बीवाई विजयेंद्र शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गोविंद कारजोल मुदूल येथून, बेल्लारी येथून श्रीरामुलु, मुर्गेश निरानी बिलगी येथून लढणार आहे. तसेच कागवाड येथून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहे. अशी माहिती अरुण सिंह यांनी दिली.

या यादीत नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 9 उमेदवार डॉक्टर, 31 उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट, 5 वकिल, 1 आयईएस, 1 आयपीएस, तीन सेवानिवृत्त अधिकारी आणि आठ महिलांना तिकिट दिलेले आहे. तर 32 उमेदवार ओबीसी, 30 एससी आणि 16 एसटी प्रवर्गातील आहे. असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com