'आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रँडची व्हिस्की?' भाजपकडून राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर

'आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रँडची व्हिस्की?' भाजपकडून राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर

भाजप प्रदेश कार्यालयाचे संजय राऊत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर
Published by  :
shweta walge

संजय राऊतांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे. मकाऊच्या कसिनोमध्ये जुगार खेळणारा व्यक्ती कोण असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊत जुगार खेळणारे महाशय कोण असा सवालही त्यांनी विचारला आहे. यानंतर आता भाजपकडून संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भाजपने आपल्या ट्विटरवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com