ताज्या बातम्या
Beed : बीडमध्ये मशिदीत स्फोट; दोघांना घेतलं ताब्यात
बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली.
बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अर्धमसला गावातील मशिदीत रात्री 2.30 वाजता हा स्फोट झाला. मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहेत. मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली असून जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.