Delhi Blast
Delhi Blast

Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला परिसरात स्फोट; स्फोट होण्याआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज आला समोर

स्फोट होण्याआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज आला समोर
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • दिल्ली लाल किल्ला परिसरात स्फोट

  • 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी

  • स्फोट होण्याआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज आला समोर

(Delhi Blast ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कसा झाला? याचा तपास आता घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Delhi Blast
Delhi Blast : दिल्ली स्फोटाला नवं वळण; स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, हुंडाई आय-20 कारची अनेकदा खरेदी विक्री

यातच आता स्फोट होण्याआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज आला समोर असून यामध्ये एक माणूस मास्क घालून ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला दिसत आहे. पुलवामाचा उमर मोहम्मद कार चालवत असल्याचं समोर आले असून दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी UAPA कलम 16, 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com