Konkan Railway line: कोकण रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे करमळी ते वेरणा रेल्वेस्थानकांदरम्यान ब्लॉक; इतर एक्स्प्रेसचे वेळापत्रक काय?

Konkan Railway line: कोकण रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे करमळी ते वेरणा रेल्वेस्थानकांदरम्यान ब्लॉक; इतर एक्स्प्रेसचे वेळापत्रक काय?

करमळी ते वेरणा रेल्वेस्थानकांदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे ब्लॉक; इतर एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी ते वेरणा स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड ते तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर बदल केला आहे. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेच्या करमळी ते वेरणा विभागात ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२२१८ चंदीगड ते तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्याआधी ४५ मिनिटे थांबवण्यात येईल.

गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्या आधी ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com