काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा; कोर्टाने दिला आदेश

काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा; कोर्टाने दिला आदेश

सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी ही पदयात्रा पोहोचली आहे. काँग्रेसच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सोशल मीडियात निर्माण झालं आहे.यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या. ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेतील व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगित वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. तात्पुरत्या काळासाठी ही खाती ब्लॉक करण्यात यावीत, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. अशी माहिती एका वृत्त माध्यमातून देण्यात आली आहे.

काँग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराईट) आरोप कंपनीने केला होता. याप्रकरणी यशवंतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. काँग्रेसने बेकायदेशीरपणे चित्रपटातील संगीत वापरल्याचं प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरून संबंधित तीन लिंक काढून टाकाव्यात, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com