BMC Election Reservation
BMC Election Reservation BMC Election Reservation

BMC Election Reservation : मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांसाठी 'इतके' वॉर्ड राखीव, अनुसूचित जाती-जमातींसाठी कोणते वॉर्ड?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2025) प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी बांद्र्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडली
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2025) प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी बांद्र्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

सोडतीनुसार, एकूण 227 प्रभागांपैकी 114 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव** ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रवर्गांनुसार पुढीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे –

  • अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड राखीव असून त्यापैकी 8 वॉर्ड महिला उमेदवारांसाठी असतील.

  • अनुसूचित जमातींसाठी 2 वॉर्ड राखीव असून 1 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असेल.

  • ओबीसी प्रवर्गासाठी 61 वॉर्ड, त्यापैकी 31 महिला उमेदवारांसाठी राखीव.

  • सर्वसाधारण प्रवर्गात 149 वॉर्ड, त्यापैकी 74 वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

नागरिकांना 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत या प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना देण्याची संधी असेल. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

अनुसूचित जमातींसाठी राखीव वॉर्ड

  • प्रभाग क्रमांक 53 आणि 121

अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड (महिला आरक्षणासह)

  • प्रभाग क्रमांक – 26, 93, 151, 186, 146, 152, 155, 147, 189, 118, 183, 215, 141, 133, 140

महिला उमेदवारांसाठी राखीव वॉर्ड

  • अनुसूचित जाती महिला – 133, 183, 147, 186, 155, 118, 151, 189

  • अनुसूचित जमाती महिला– 121

या सोडतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com