Eknath Shinde
Eknath ShindeEknath Shinde

Eknath Shinde : उमेदवारीचा यू-टर्न! ठाकरे बंधूंना घेरण्यासाठी शिंदेंची नवी रणनीती

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये शिवसेना (शिंदे गट) अडचणीत सापडली आहे. उमेदवारीच्या निर्णयामुळे पक्षातीलच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून, राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Eknath Shinde : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये शिवसेना (शिंदे गट) अडचणीत सापडली आहे. उमेदवारीच्या निर्णयामुळे पक्षातीलच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून, राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्यभर महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. प्रभागांची रचना, उमेदवारांची निवड यावरून सर्वच पक्षांत घडामोडी घडत आहेत. मुंबईतही हेच चित्र आहे. दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये मनसेने यशवंत किल्लेदार यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय हालचाली वेगवान झाल्या.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख प्रकाश पाटणकर यांनी पत्नी प्रीती पाटणकर यांच्यासह शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच प्रीती पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या निर्णयामुळे पक्षातील जुने आणि सक्रिय कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

या वॉर्डमधून कुणाल वाडेकर हे प्रमुख दावेदार मानले जात होते. ते माजी आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक असून, अनेक वर्षे पक्षासाठी काम करत आहेत. मात्र त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने वाडेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. उपविभाग प्रमुख निकेत पाटील आणि शाखाप्रमुख अभिजित राणे यांनाही तिकीट न मिळाल्याने नाराजी वाढली आहे.

या सर्वांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी मांडली आहे. “जमिनीवर काम करणाऱ्यांना बाजूला ठेवून नव्याने आलेल्यांना संधी दिली जात असेल, तर आम्ही काम कसे करायचे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वॉर्ड १९२ मधील अनेक पदाधिकारी एकत्रित राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे दादरमधील या वॉर्डात शिंदे गटासमोर अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

थोडक्यात

• मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये शिंदे गट अडचणीत
• उमेदवारीच्या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) मधील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष
• नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनाम्याची चर्चा सुरू
• राज्यभर महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी; सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग
• प्रभाग रचना आणि उमेदवार निवडीवरून राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत
• मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजी उफाळली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com