bmc election result 2026 nishikant shinde triumphs over samadhan sarvankar
ताज्या बातम्या
Nishikant Shinde : माहिममध्ये शिंदेसेनेला झटका, निशिकांत शिंदे गाजले; समाधान सरवणकर पराभूत
Samadhan Saravankar : मुंबई महापालिका निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे.
Samadhan Saravankar : मुंबई महापालिका निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. या प्रभागात शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून ठाकरे गटाने बाजी मारली आहे.
माजी आमदार सदा सरवणकर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता त्यांच्या मुलालाही महापालिकेत अपयश आले आहे. ठाकरे गटाशी संबंधित निशिकांत शिंदे यांनी माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
प्रभाग १९४ हा शिंदे गटाचा मजबूत भाग मानला जात होता. मात्र सुरुवातीपासूनच मतमोजणीत निशिकांत शिंदे आघाडीवर राहिले. शेवटपर्यंत चुरस टिकून राहिली, पण अखेर मतदारांनी बदलाला कौल दिला. या निकालामुळे या भागात सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

