Mumbai Garbage Vehicle : BMC कर्मचाऱ्यांची धोकादायक कामगिरी! 3000 कोटींच्या कंत्राटानंतरही कचरा व्यवस्थापनात गडबड

Mumbai Garbage Vehicle : BMC कर्मचाऱ्यांची धोकादायक कामगिरी! 3000 कोटींच्या कंत्राटानंतरही कचरा व्यवस्थापनात गडबड

3000 कोटींच कंत्राट देवूनही धोकादायक गाड्यांमधून कचरा वेचतायत BMC कर्मचारी ,लोकशाही मराठीच्या बातमीनंतरही राज्य सरकारच झोपेच सोंग
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांच आयुष्य धोक्यात असून कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवूनही गेली, तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात आहे. 3000 कोटींच कॉंन्ट्रॅक्ट, तो लाडका भाऊ कोण? असा सवाल लोकशाही मराठीकडून करण्यात आला होता. मात्र लोकशाही मराठीच्या बातमीनंतरही राज्य सरकारने झोपेचं सोंग घेतलं का असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून कचरा वेचण्यासाठी फिरणाऱ्या गाड्या या सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 वेळा फिरवण्यासाठीचा नियम आहे. मात्र बहुतेक वेळा या गाड्या केवळ सकाळच्या एकच वेळेस फिरवल्या जातात.

दुपार आणि सायंकाळी या गाड्या कचरा वेचण्यासाठी मुंबईच्या अनेक भागात दिसतच नाहीत. केवळ कागदावरच दुपार आणि संध्याकाळच्या कचरा वेचणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या दाखवल्या जात असल्याचा देखील आरोप होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com