Admin
बातम्या
वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये BAMSच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; विद्यार्थी आक्रमक
मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. वरळी येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये BAMSला शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे, वय २२ वर्षे याला झाडावरून पडून त्याच्या डोक्यात दुखापत झाली होती.
मात्र या विद्यार्थ्याला त्याच हॉस्पिटलमधील सेवा अभावी जीव गमवावा लागला. हॉस्पिटलची ओपीडी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या डीनने जखमी दयानंदला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही आणि उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.