Virar Breaking
ताज्या बातम्या
Virar Breaking : विरारमध्ये नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह
विरारमध्ये नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Virar Breaking ) विरारमध्ये नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरारच्या म्हाडा परिसरातील नाल्यात तरुणाचा मृतदेह सापडला असून आकाश पगारे हा 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता,
त्याच्या कुटुंबीयांनी 18 नोव्हेंबर रोजी तो मिसिंग असल्याची तक्रार बोळींज पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र सकाळच्या सुमारास नागरिकांना गटाराच्या पाण्यावर मृतदेह दिसला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची काहीवेळातच ओळख पटवून त्याचा मुतदेह त्याच्या परिवाराकडे स्वाधीन करण्यात आला.
Summery
विरारमध्ये नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह
विरारच्या म्हाडा परिसरातील नाल्यात तरुणाचा मृतदेह
प्रभातफेरीसाठी आलेल्या नागरिकांना आढळला मृतदेह
