धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याची माहिती मिळत आहे. या लिपिक भरती घोटाळ्यात माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

'या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही.या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे असे एका माध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

मंत्रालयातील या बोगस लिपिक भरती रॅकेटप्रकरणी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com