Sandeep Deshpande : मंत्री आशिष शेलारांच्या मतदारसंघात बोगस मतदार, मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पोलखोल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वांद्रे पश्चिमचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघातील मतदारयाद्यांचा घोळ बाहेर आणला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत. “आशिष शेलार दुसऱ्यांचे मतदारसंघ शोधून काढतात. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आशिष शेलारांची सवय आहे. त्यांच्या मतदारसंघात शोध घेतल्यानंतर मतदार यादीतील घोटाळे बाहेर आले. त्यातले तीन ते चार घोटाळे आपल्यासमोर मांडतोय. त्याची रीतसर तक्रार रिर्टनिंग ऑफिसरकडे करणार आहोत“ असं संदीप देशपांडे म्हणाले.
“आशिष शेलार राहतात, त्याच्या बाजूला सारंग तरंग बिल्डिंग आहे. या सारंग तरंग बिल्डिंगमध्ये 1 ते 28 नंबर पर्यंत फ्लॅट आहेत. जिथे 1 ते 28 घर क्रमांक आहे, त्या इमारतीत दोन नाव आढळली. समुद्री बासू कलको या महिला असाव्यात, त्यांच्या पतीच नाव बासू कलको असावं. घर क्रमांक 455. ज्या इमारतीत 1 ते 28 फ्लॅट आहेत, तिथे 455 क्रमांकाचा फ्लॅट कुठून आला?. आमचे विभागअध्यक्ष तिथे राहतात. तिथे कुठलही 455 क्रमांकाच घर नाही. सोसायटीच्या सेक्रेटरीशी आम्ही बोललो. असा कुठला माणूस तिथे भाड्याने रहायला आला होता का? त्यांनी नाही असं सांगितलं. त्याचं सोसायटीत दुसरं नाव आहे, अनिताराज ऋतेश्वर. पतीच नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज घर क्रमांक आहे 12/33 . हा कुठला क्रमांक आहे माहित नाही. या सारंग तरंग सोसायटीत कोणतीही व्यक्ती 15-30 वर्ष राहिलेलं नाही. मग यांचं नाव मतदार यादीत कसं आलं? याचं संशोधन निवडणूक आयोगाने करावं“ असं संदीप देशपांडे म्हणाले.
