Bolero Car Sinking in Flood Water
Bolero Car Sinking in Flood WaterTeam Lokshahi

थरार... पुलावरील खड्ड्यात बोलेरो वाहन अडकले पुरात; वाचा कसे वाचले सर्वांचे प्राण...

वाहन पुरात वाहून जाणार हे सर्वांच्या लक्षात येताच सर्वजण वाहनातून खाली उतरले

भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यातील ढगा भवन रस्त्यावरील धाम नदीच्या पुलावर खड्ड्यात बोलेरो वाहन अडकले. नदीला ओसंडून पूर येताच सर्व जणांनी वाहनातून उतरून स्वतःचे प्राण वाचवले. काल सायंकाळची जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होता. जंगल परिसरात धोधो पाऊस पडला. यात धाम नदीला पूर सुरु होता.महा नेटवर्क मध्ये काम करणारे पाच जण आपल्या बोलेरो वाहन घेऊन खैरवाडा येथील एका मुलाला सोडण्यासाठी जात होते.धाम नदीच्या पुलावरून थोडं पाणी वाहत असताना वाहन पुरातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्यानं सरळ वाहन खड्ड्यात जाऊन अडकले. पाचही जण वाहनात बसून असताना एवढ्यात पुराचा ओस वाढू लागला. वाहन पुरात वाहून जाणार हे सर्वांच्या लक्षात येताच सर्वजण वाहनातून खाली उतरले,सर्वांचा जीव भांड्यात पडताच डोळ्यासमोर वाहन पुरात वाहून गेले. हा सर्व थरार पाचही जणांना थरकाप आणणारा होता.

Bolero Car Sinking in Flood Water
UAE हून आलेल्या बुडणाऱ्या जहाजातील 19 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश

'तो' खड्डा धोकादायक:

जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.यामुळे जंगलातून उगम पावलेली धाम नदीला ओसंडून वाहत असताना ढगा भवन जवळून ब्राह्मणवाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धाम नदीच्या पुलावर खड्डा पडला आहे.पुलावरून पाणी वाहत असताना अनेक चालक आपले वाहन पुरातून टाकतात असाच काल सायंकाळी चालकाने आपले वाहन पुरातून टाकण्याचा प्रयत्न केला अन या खड्ड्यात हे वाहन जाऊन अडकल्याने हा खड्डा सध्या धोकादायक झाला आहे.

थरकाप...अंगावर शहारे आणणारा:

महा नेटवर्क मध्ये काम करणारे पाच जण सायंकाळी परत गावाला जात असताना यातील एका जनाला खैरवाडा येथे सोडायचे होते त्यामुळे त्यांनी या रस्त्याने जावे लागत होतं.त्यांनी खैरवाडा येथे जाण्यासाठी वाहन या रस्त्याने आणले.अन पुरातून वाहन टाकताच खड्ड्यात वाहन अडकले आणि पाच जणांचा जीव टांगणीला लागला.असा सर्व थरकाप अंगावर शहारे आणणारा ठरला. मात्र यात घटनेत पाचही जणांचा प्राण वाचला. मात्र बोलेरो वाहन पुरात वाहून गेले.

Lokshahi
www.lokshahi.com