Drowning Ship
Drowning ShipTeam Lokshahi

UAE हून आलेल्या बुडणाऱ्या जहाजातील 19 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश

भारतीय तटरक्षक दलाने १८ भारतीय आणि ०१ इथिओपियन मास्टरसह १९ जणांना यशस्वीरित्या वाचवले.

लक्ष्मीकांत घोणसेपाटील | रत्नागिरी: यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जाणारं हे जहाज रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे ४१ मैल समुद्रात बुडत होते. या जहाजात असलेल्या १८ भारतीय आणि ०१ इथिओपियन मास्टरला भारतीय तटरक्षक दलाने मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या वाचवले. हे जहाज रत्‍नागिरी किनार्‍यापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेस बुडत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Drowning Ship
मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यासाठी अयोग्य...

अश्याप्रकारे झालं बचावकार्य:

अॅस्फाल्ट बिटुमेन ३९११ एमटी वाहून नेणारं जहाज सकाळच्या सुमारास अचानक बुडत असल्याचे जहाजावरील क्रू मेंबर्सला निदर्शनास आले. जहाजातून मदतीचा संदेश मिळाल्याच्या काही मिनिटांतच, सागरी बचाव समन्वय केंद्र मुंबई कृतीत उतरले. ICGS सुजीत आणि ICGS अपूर्वा या परिसरात गस्त घालत असलेल्या तटरक्षक दलाच्या दोन जहाजांना तत्काळ अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आले. जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे पाहून क्रू ने जहाज सोडून दिले. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील १९ जणांची सुखरुप सुटका केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com