Water Tap
Water TapTeam Lokshahi

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यासाठी अयोग्य...

तीन चार दिवसात पाणी पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल.
Published by :
Vikrant Shinde

मुंबईकरांना यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. याचं कारण म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या तलावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं यंदा मुंबईकरांसाठी मुबलक पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, या तलावांच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं मुंबईकरांना वेगळीच समस्या भेडसावणार आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे धरणा मधून पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यामध्ये गडूळपणा वाढला आहे.

Water Tap
Vedanta Foxconn: मविआ सरकार या प्रकल्पासाठी उदासीन होतं - सुधीर मुनगंटीवार

मुंबई महानगरपालिकेचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन:

'मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणा मधून पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यामध्ये गडूळपणा वाढला आहे. तथापि सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य नाही. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे. तीन चार दिवसात पाणी पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल.' असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com