Sikandar Box Office Collection : सलमान खानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकांचा कसा आहे प्रतिसाद ?, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Sikandar Box Office Collection : सलमान खानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकांचा कसा आहे प्रतिसाद ?, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

सलमान खान आणि ईद असं जुनं समीकरण आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या वर्षीदेखील सलमान खानने चाहत्यांना ईदचे खास गिफ्ट दिले आहे. 'सिकंदर' हा बहुचर्चित चित्रपट काल म्हणजे 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये सलमान आणि रश्मिका मंदना यांची फ्रेश जोडी बघायला मिळत आहे. हा चित्रपट किती कमाई करणार आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या इतका पसंतीस उतरला नाही. या वर्षी 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली होती. मात्र 'सिकंदर' चित्रपट 'छावा' समोर तितका तग धरू शकला नाही. त्याचप्रमाणे सलमानच्या 'सिकंदर'ची कमाई ही त्याच्याच 'टायगर 3' इतकीदेखील कमाई करु शकला नाही.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आज सकाळपर्यंत या चित्रपटाने केवळ 26 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. मात्र 'छावा' ची पहिल्या दिवसाची कमाई 33.5 कोटी रुपये होती. त्याचप्रमाणे राम चरणच्या 'गेम चेंजर' ची कमाई 54 कोटी इतकी होती. 'सिकंदर'कडून अशी अपेक्षा होती की हा चित्रपट 'छावा'चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडू शकेल, पण तसं झालं नाही. अशातच 10 एप्रिल रोजी सनी देओलचा 'जाट' प्रदर्शित होण्यासाठी अजून 10 दिवस शिल्लक आहेत. कदाचित हा चित्रपट काही इतिहास घडवेल, अशी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com