Diljit Dosanjh : पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे 'Sardaar ji 3' चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही

Diljit Dosanjh : पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे 'Sardaar ji 3' चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही

'सरदार जी 3' चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदी, पाकिस्तानी कलाकारांमुळे वाद
Published by :
Shamal Sawant
Published on

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने रविवारी रात्री उशिरा 'सरदार जी ३' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. 27 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर देखील दिसली. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही, पंजाबी चित्रपटात हानियाच्या भूमिकेने अनेकांना अस्वस्थ केले आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि सर्व पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली. त्यामुळे 'सरदार 3' मध्ये हानिया दिसल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. पण वाद वाढण्यापूर्वीच निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सहनिर्मात्यांनी केले स्पष्ट :

'सरदार जी 3' चित्रपटाचे सह-निर्माते गुणबीर सिंग सिद्धू यांनी सांगितले की, 'आमचा चित्रपट भारत-पाकिस्तान तणावाच्या खूप आधी चित्रित झाला होता, परंतु सध्याची परिस्थिती आणि भारत आणि भारतीय लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही भारतात चित्रपट प्रदर्शित करत नाही आहोत.' गुनबीर पुढे म्हणाले की, भारतात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहेल.

दिलजीत दोसांजवरही नेटकऱ्यांनी साधला निशाणा

'सरदारजी 3' चा ट्रेलर प्रदर्शित होताच, नेटकऱ्यांनी दिलजीत दोसांझवर संताप व्यक्त केला. कारण या चित्रपटात तो पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत दिसणार आहे. एका युजरने अभिनेत्याला तो देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगितले. दुसऱ्या युजरने म्हटले की त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. याशिवाय इतर काही युजर्सने त्याला खलिस्तानी म्हटले आहे.

आता हे स्पष्ट झाले आहे की चित्रपटाचे निर्माते तो भारतात प्रदर्शित करणार नाहीत. म्हणजेच 'सरदार जी 3' आता 27 जून रोजी परदेशात प्रदर्शित होईल. या चित्रपटात रोमान्स, अॅक्शन आणि कॉमेडी यांचे उत्तम मिश्रण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com